Bhayandar land Dispute : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असगर अली वोरा आपल्या जमिनीचा ताबा परत मिळवण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहेत. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने ही मालमत्ता सोडल्याचे जाहीर केले, तरी अन्य विकासक मुकेश पारेख यांनी या जमिनीचा ताबा आपल्याकडेच कायम ठेवल्याचा दावा केला जात आहे.